लष्कराचे वाहन दरीत कोसळले   

जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन जवानांचा मृत्यू

रामबन /जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात भारतीय लष्कराचे वाहन रविवारी ७०० फूट खोल दरीत कोसळून तीन जवानांचा मृत्यू झाला. लष्करी वाहनांचा ताफा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरुन जम्मू ते श्रीनगर, असा प्रवास करत होता. त्या पैकी एक वाहन बॅटरी चष्मा परिसरात सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून घसरले आणि सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळले. यानंतर पोलिस, लष्कर आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दल आणि स्थानिक स्वयंसेवकांनी संयुक्तपणे मदतकार्य राबविले. घटनास्थळी तीन जवानांचे मृतदेह सापडले असून वाहनांचा चेंदामेंदा झाला होता. शिपाई अमित कुमार, सुजित कुमार आणि मन बहाद्दूर याचा मृत्यू अपघाात झाला आहे. त्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत. 

Related Articles